Sunday, May 31, 2026
Homeचंद्रपूरअंगावर वीज कोसळून तरुणाचा मृत्यू..!

अंगावर वीज कोसळून तरुणाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात आज,गुरुवार ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात आज दुपारच्या सुमारास गुरे चराई करीत असतांनाच अचानकपणे अंगावर वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळनेरी गावानजीक  शेतशिवरात घडली.गणेश भाऊराव धानोरकर वय ३२ वर्षे, रा.पिंपळनेरी,ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील रहिवासी गणेश धानोरकर हा तरुण शेतकरी आज गुरुवारी दुपारी पिंपळनेरी येथील शेतशिवारात गुरे चारत होता.यादरम्यान दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला.यावेळी गणेशच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!