उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील बोरमाळा येथे काल २९ मार्च रोजी बुधवारी सायंकाळी हृदयद्रावक घटना घडली असून अंगणात शौचास बसलेल्या एका चार वर्षीय मुलाला बिबट्याने आपल्या जबड्यात उचलून नेत ठार केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
हल्ली उन्हाळा सुरू झाल्याने पाण्यासाठी भटकंती करीत जंगलातील प्राणी गावाकडे येऊन मानवी संघर्षात वाढ होण्याची दाट शक्यता बळावली आहे.अशातच काल बुधवारी घरासमोरील अंगणात शौचास बसलेल्या मुलाला बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर उचलून नेले.आईच्या डोळ्यादेखत ही घटना घडली.बिबट्या मुलाला नेत असल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला.यावेळी आजूबाजूचे नागरीक गोळा झाले.परंतु, मुलाला वाचविता आले नाही.
सावली तालुक्यातील बोरमाळा येथे काल बुधवारी २९ मार्च रोजी संध्याकाळी ही घटना घडली.हर्षद कारमेंगे असे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.आईच्या डोळ्या देखत घटना घडल्याने एकच टाहो फोडला.गावातील नागरिकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केला मात्र काल थांगपत्त लागला नाही.आज सकाळी घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात त्याचा मृतदेह सापडला.सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई वन विभागातर्फे करण्यात आली.