- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-एका ४० वर्षीय नराधमाने साडेचार वर्षीय चिमुकलीला शेजारच्या घरात बोलावून विनयभंग केल्याची घटना चार दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी देसाईगंज तालुक्यात उघडकीस आली. प्रकरणी आरोपी प्रमोद मन्साराम सव्हारे यास चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून त्याच दिवशी देसाईगंज पोलिसांनी अटक करून शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची ३१ जुलै पर्यंत तुरुंगात रवानगी केली आहे.आरोपी प्रमोद सव्हारे हा देसाईगंज तालुक्यातील रहीवासी असून घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेच्या दिवशी साडेचार वर्षीय चिमुकली खेळत असतांना आरोपीने शेजारच्या घरी बोलावले व लज्जास्पद कृत्य करून विनयभंग केला.ना समज असलेल्या चिमुकलीने तिच्या आईला आपबिती सांगितली.त्यानुसार पीडितेच्या आईने तात्काळ देसाईगंज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.अतीसंवेदनशील प्रकरणामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली व आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम ८ सह बाल न्याय (बाल संरक्षण) अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ७४ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.जिला धड बोलताही येत नाही,चांगले काय व वाईट काय,याची साधी कल्पनाही नाही,अश्या चिमुकलीचा ४० वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याने,अश्या विकृत मानसिकतेच्या आरोपीस कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
- Advertisement -

