- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका ३३ वर्षीय नराधम युवकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.प्रकरणी प्रकाश सिद्धार्थ सुखदेवे वय ३३ वर्षे,रा.बोंदरी,ता.मोहाडी याचेवर तक्रारी अंती आंधळगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या
कलम ६५(१),१३७(२) व भारतीय न्याय संहिता सहकलम ४,८ अंतर्गत अटक करुन कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.३३ वर्षीय प्रकाश सुखदेवेने सुरुवातीलाएका अल्पवयीन तरुणीसोबत परिचय वाढवला.नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.प्रकरणी तरुणीने आंधळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ठाणेदार नितीन राठोड,विजेंद्र वैद्य,मंगेश गभणे,राकेशसिंह सोलंकी व महिला पोलिस शिपाई यांनी आरोपीला त्याच्या गावामधून ताब्यात घेत पोक्सो कायद्या तसेच बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
- Advertisement -

