नागपूर :-नागपूरच्या रवी भवन येथे शनिवार ६ सप्टेंबर रोजी विदर्भातील ओबीसी संघटनेच्या विविध पदाधिकारी तसेच नेत्यांनी बैठक आयोजित करून बैठकीत मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासंदर्भात स्पष्ट विरोध दर्शविला होता.मराठा आरक्षणाच्या बाबतीत शासन निर्णय काढण्यात आले. पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला व नंतर दुसरा शासन निर्णय काढून पात्र शब्द वगळण्यात आला.याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो.काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे,असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हटले होते आणि पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.अश्यातच आता मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयांना विरोध करीत ओबीसी,विजेएनटी,एसबीसी या बहुजनांचा आवाज बुलंद करण्यासाठी समता परिषदेतर्फे उद्या,गुरुवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता महात्मा फुले सभागृह,रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत.राज्य शासनाच्या मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीने,मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन २ सप्टेंबर २०२५ ला काळा शासन निर्णय काढून,मराठा जातीला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा शासन निर्णय काढून संविधान,उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, जात पडताळणीचा कायदा हे सारे डावलून ओबीसींची फसवणूक केलेली आहे. त्याचा ओबीसी बहुजनांकडून सर्वत्र निषेध होत आहे.या घुसखोरीमुळे ओबीसी युवक आत्महत्या करीत आहेत.या सर्व मुद्द्यांवर या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. सोबत ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी व ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसींचा लढा लढण्यासाठी या मेळाव्यात महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील.महात्मा फुले समता परिषद,विविध ओबीसी संघटना व बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे.
उद्याला ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी व ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी मेळावा.. – मंत्री छगन भुजबळ करणार मार्गदर्शन..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

