- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुंबईच्या चेंबूर भागातील सिद्धार्थ कॉलनीत ३ मजली इमारतीला आग लागून एकाच कुटुंबातील ३ मुलांसह ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवारी ६ ऑक्टोंबरच्या पहाटे ५:३० वाजता घडली.पेरिस गुप्ता वय ७ वर्षे,मंजू प्रेम गुप्ता वय ३० वर्षे,अनिता गुप्ता वय ३९ वर्षे,प्रेम गुप्ता वय ३० वर्षे आणि नरेंद्र गुप्ता वय १० वर्षे अशी मृतांची नावे आहेत.उर्वरित २ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.मात्र,काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली,मात्र,तेथे राहणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही.आग विझवल्यानंतर त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही.मात्र,शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.शॉर्टसर्किटमुळे दुकानात स्फोट झाला आणि आग संपूर्ण इमारतीत पसरली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,घरात प्रवेश करण्याचा एकच मार्ग होता.आगीच्या प्रचंड ज्वाळा पाहून शेजाऱ्यांना आत अडकलेल्या कुटुंबाला वाचवता आले नाही. घराबाहेरील आग विझवण्यातही अग्निशमन दलाला यश आले.आग विझेपर्यंत त्यांना आत जाता आले नाही.त्यामुळे कुटुंबीयांची वेळीच सुटका होऊ शकली नाही.
- Advertisement -

