Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीविधानसभा तिकिटासाठी वाट्टेल ते..! राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी.... - बंडखोरीचा फटका प्रत्येक...

विधानसभा तिकिटासाठी वाट्टेल ते..! राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी…. – बंडखोरीचा फटका प्रत्येक राजकीय पक्षाला बसण्याची शक्यता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे.अशातच आगामी विधानसभा निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे.पक्षातील दावेदार जनसंपर्क वाढविण्यावर भर देत आहेत.इच्छुक मंडळी वरिष्ठांच्या गाठीभेटी घेण्यासाठी मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या करीत आहेत. भावी आमदार लग्न सोहळे,वाढदिवस, विविध आंदोलने,महाप्रसाद,तसेच धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावतांना दिसत आहेत.महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही.आपल्याच पक्षाला जागा सुटेल,असा दावा निष्ठावान करीत आहेत.येत्या दहा-बारा दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे निश्चित नसल्याने इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते व नेते शासकीय योजनांची माहिती देण्याच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी,महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.जिल्हा पातळीवरील नेतेमंडळी अधिकाधिक जागा आपल्याच पक्षाला सुटाव्यात,यासाठी प्रयत्न करीत आहेत.विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करावे,असे इच्छुकांना वाटत आहे.
विधानसभा क्षेत्रात पक्षाचे काही खरे नसतानाही कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळावी,यासाठी वरिष्ठांचे कान भरीत आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्याही वाढत आहे.महायुती,महाविकास आघाडी, वंचित आदी पक्षात इच्छुकांची संख्या वाढली आहे; परंतु कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळेल हे सध्यातरी सांगता येत नसल्यामुळे प्रत्येक इच्छुक सावधगिरी बाळगत आहे.बंडखोरीचा फटका प्रत्येक राजकीय पक्षाला बसण्याची शक्यता आहे.सर्वच मतदारसंघांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!