Sunday, July 12, 2026
Homeमुंबई३ मजली इमारतीला आग; एकाच कुटुंबातील ३ मुलांसह ७ जणांचा होरपळून मृत्यू...-आज...

३ मजली इमारतीला आग; एकाच कुटुंबातील ३ मुलांसह ७ जणांचा होरपळून मृत्यू…-आज पहाटेची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुंबईच्या चेंबूर भागातील सिद्धार्थ कॉलनीत ३ मजली इमारतीला आग लागून एकाच कुटुंबातील ३ मुलांसह ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवारी ६ ऑक्टोंबरच्या पहाटे ५:३० वाजता घडली.पेरिस गुप्ता वय ७ वर्षे,मंजू प्रेम गुप्ता वय ३० वर्षे,अनिता गुप्ता वय ३९ वर्षे,प्रेम गुप्ता वय ३० वर्षे आणि नरेंद्र गुप्ता वय १० वर्षे अशी मृतांची नावे आहेत.उर्वरित २ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.मात्र,काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली,मात्र,तेथे राहणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही.आग विझवल्यानंतर त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही.मात्र,शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.शॉर्टसर्किटमुळे दुकानात स्फोट झाला आणि आग संपूर्ण इमारतीत पसरली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,घरात प्रवेश करण्याचा एकच मार्ग होता.आगीच्या प्रचंड ज्वाळा पाहून शेजाऱ्यांना आत अडकलेल्या कुटुंबाला वाचवता आले नाही. घराबाहेरील आग विझवण्यातही अग्निशमन दलाला यश आले.आग विझेपर्यंत त्यांना आत जाता आले नाही.त्यामुळे  कुटुंबीयांची वेळीच सुटका होऊ शकली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!