Monday, July 27, 2026
Homeचंद्रपूर२८ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या..!

२८ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका २८ वर्षीय तरुणाची अज्ञात चार तरुणांनी चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची  खळबळजनक घटना काल,शुक्रवारी २७ डिसेंबरच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास मुल येथे घडली.त्यामुळे शहरात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.रीतिक अनिल शेंडे वय २८ वर्षे रा.मुल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल शुक्रवारी रात्री रोहीत शेंडे हा पंचायत समिती नजिक असलेल्या नगर पालिकेच्या बस थांबा शेड मध्ये बसला होता.अशातच अचानकपणे येत चार युवकांनी त्याच्यासोबत वाद घातला.वाद सुरू असतांनाच चाकूने पोटावर आणि पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहीतला काही नागरिकांनी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच  रात्री नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलिस ठाण्यात  मोठा जमाव गोळा झाला होता.घटनेच्या निषेधार्थ आज,शनिवारी मूल मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला.घटनेनंतर मूलमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.दंगा नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!