- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-पार्सल वितरण करण्याचे काम करणाऱ्या एका तरुणाने माडगी येथील वैनगंगेच्या पुलावर स्कूटी उभी करून दुथडी वाहणाऱ्या नदीत पुलावरून उडी घेतल्याची घटना काल,गुरुवारी १२ सप्टेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.शांतनु ऊर्फ पिकू चाचीरे वय २५ वर्षे असे या तरुणाचे नाव आहे. शांतनूने टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण कळू शकले नाही.
शांतनू हा यापूर्वी देव्हाडी येथे राहत होता.पूर्वी तो डीजे वाद्य वाजविणाऱ्या मंडळाकडे काम करायचा.त्यानंतर तो तुमसर येथे राहायला गेला.काल,गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शांतनू हा स्कूटीने (क्र.एमएच ३६ एजे २०६८) माडगी नदी पुलावर पोहोचला.स्कूटी बाजूला ठेवून त्याने थेट नदीच्या जुन्या पुलावरून वैनगंगा नदीपात्रात उडी घेतली.हे प्रत्यक्ष दृश्य तेथून मार्गक्रमण करणाऱ्या काही नागरिकांनी बघितले.त्यामुळे एकच खळबळ माजली.नदीत उडी घेणारा युवक कोण आहे; याची चौकशी सुरू झाली. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.पोलिस घटनास्थळी पोहोचले. नदीत उडी घेणारा तुमसर येथील शांतनू चाचीरे आहे; असे प्राथमिक चौकशीनंतर पुढे आले.दुथडी वाहणाऱ्या वैनगंगा नदीत शांतनूने उडी का घेतली? पुढील तपास पोलिस करीत आहेत.
- Advertisement -

