उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- शेतीसाठी लागवड करण्याकरिता लागणारा खर्च आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीचा विचार करुण महाराष्ट्र शासनाने केन्द्र सरकारकडे ४६६१ रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा; अशी शिफारस केली.या वर्षी धानाच्या हमिभावात ११७ रुपयाची वाढ केली असली तरी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारु शकत नाही.हमी भाव आणि प्रस्तावित किंमतीची मागणी यातील तफावत महाराष्ट्र सरकारने बोनस स्वरुपात शेतकऱ्यांना प्रदान करावी;अशी मागणी माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांनी आज,शुक्रवारी देसाईगंज विश्राम गृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत केली आहे.
वाढते मजुरीचे दर,खताचे दर आणि लागणारा एकुण खर्च यामुळे शेती व्यवसाय करणे शेतकऱ्यांना न परवडण्या सारखे झाले आहे.यावर विचार मंथन करुन महाराष्ट्र सरकारने धानाला प्रतिक्विंटल ४६६१ रुपये किंमत द्यावी; असा अहवाल केन्द्र सरकार ला पाठवला,केन्द्र सरकारने एमएसपी दरात ११७ रुपयाची वाढ केली आहे.मात्र,एवढ्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ होऊ शकत नाही.आताची हमीभाव किंमत २३१७ व शासनाने प्रस्तावित केलेली ४६६१ या दरातील असलेली तफावत रुपये २३४४ प्रतिक्विंटल प्रमाणे बोनस स्वरुपात शेतकऱ्यांना प्रदान करावी; अशी मागणी माजी आम.डॉ रामकृष्ण मडावी यांनी पत्रपरिषदेत केली.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळुन काम केले आहे.या विधानसभेत हरिराम वरखडे यांचेसह मी दोनदा या विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभेची जागा उबाठा शिवसेना पक्षालाच मिळावी; अशी मागणी कार्यकर्त्यांची असुन कार्यकर्त्यांच्या भावनांचा पुर्ण:ता आदर केला जाईल,असेही या प्रसंगी डॉ. रामकृष्ण मडावी यांनी नमुद केले.
या पत्रपरिषदेला शिवसेना उबाठा चे जेष्ठ नेते गोपाल चौधरी,माजी नगराध्यक्ष शरद तुमाने,दशरथ पिलारे, कल्पना तिजारे,देवराव बेदरे,किरन शालिग्राम,रामदास दहिकर,सुनिल बांगरे,नरेश हिरापुरे,मिनाक्षी मारबते, श्रृतीका बागडे,अक्षय बोरकर,रिंकु झरकर,राजु किरमे रामचंद्र मोहुर्ले यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.

