Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूर२१ वर्षीय युवक आढळून आला मृतावस्थेत..

२१ वर्षीय युवक आढळून आला मृतावस्थेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात २१ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.सदरची खळबळजनक घटना आज,गुरुवार १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे उघडकीस आली.अशातच मृत युवकाच्या जवळच आणखी एक युवक बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने  नागरिकांकडून तर्क-वितर्क लावले जात आहेत.प्रज्वल नवले वय २१ वर्षे रा.गडचांदूर असे मृतावस्थेत आढळून आलेल्या युवकाचे नाव आहे तर नागेश लांडगे वय २१ रा.गडचांदूर हा बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे.सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेची पाहणी करून पोलीस कर्मचाऱ्यांनी मृताचा पंचनामा केला. तत्पूर्वी बेशुध्द युवकास चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.सदर दोन्ही युवक गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागील परिसरात आढळून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!