- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गुराख्यांसह शेळ्या राखत असतांनाच अचानकपणे बिबट्याने हल्ला चढवून एका १६ वर्षीय तरुणीला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी लाखांदूर तालुक्याच्या मांदेड-गवराळा मार्गावरील शिवारात घडली.पूजा मंगेश मेश्राम वय १६ वर्षे, रा.मांदेड,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
पूजा परिसरातील इतर गुराख्यांसह आपल्या शेळ्या चराईसाठी मांदेड गाव नजीकच्या गवराळा मार्गावरील नाल्याजवळ घेऊन गेली होती.शेळ्या चराई करीत
असतांना ती रस्त्यालगत उभी होती.याचवेळेस शिवारातील नाल्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे पूजावर झडप घातली.तिला ठार करणार तितक्यात जवळच परिसरात उपस्थित असलेल्या गुराख्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. जोराने ओरडण्याचा आवाज ऐकून बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.दरम्यान,उपस्थितांनी जखमी पूजाला लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे आरएफओ प्रदीप चन्ने, राऊंड ऑफिसर नागपुरे,गस्ती पथक प्रमुख शिंगाडे, वनरक्षक तुकाराम डावकोरे,चंदन जारवाल तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट दिली.ऐन शेतीच्या हंगामाच्या काळातच सदरची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -

