Saturday, September 12, 2026
Homeनागपूर१६ वर्षीय आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलींचे प्रेम प्रकरणातून घरातून पलायन.. -...

१६ वर्षीय आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलींचे प्रेम प्रकरणातून घरातून पलायन.. – मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने काढले शोधून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुली जस-जश्या मोठ्या होऊ लागतात.तसे त्यांच्यातील हावभावात बदल होऊ लागतो.त्यामुळे अल्पवयीन मुलींची काळजी घेणे आवश्यक आहे. अश्यातच प्रेम प्रकरणातून घरून पलायन केलेल्या दोन अल्पवयीन मुलींना गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (एएचटीयू)शोधून जुनी कामठी व एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पहिल्या घटनेत जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवरून एका युवकाच्या प्रेमात पडली. दरम्यान,क्लासला जाते असे सांगून ४ जूनला दुपारी दोन वाजता ती घराबाहेर पडली.परंतु,ती घरी न आल्यामुळे तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे, गजेंद्रसिंग ठाकूर,श्याम अंगुलथेवार,राम निरगुडवार, दीपक गिते,अश्विनी खाइपवार यांनी मिळालेली माहिती व तांत्रिक तपास केला.तपासात ही मुलगी इन्स्टाग्रामवर एका मुलाच्या संपर्कात असल्याचे समजले.त्या मुलाने तिकीट बुक करून दिल्यानंतर अल्पवयीन मुलगी उत्तर प्रदेशात गेली.दोन दिवस तेथे थांबल्यानंतर ती ९ जून २०२५ ला ड्रॅगन पॅलेस परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने तिला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन केल्यानंतर तिला जुनी कामठी पोलिसांच्या ताब्यात दिले.दुसऱ्या घटनेत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जाते असे सांगून ११ फेब्रुवारीला एका २२ वर्षाच्या युवकासोबत निघून गेली.शाळेत जातांना ऑटोमध्येच मुलाशी तिची ओळख झाली होती.दोघेही शेगाव, राजस्थान येथे गेले.तेथून रेल्वेने ते रायपूरला परत आले.रायपूर रेल्वेस्थानकाजवळ २० ते २५ दिवस थांबल्यानंतर या मुलीने इन्स्टाग्रामवरून आपल्या भावाकडून वडिलांचा मोबाइल घेऊन त्यांना संपर्क साधून ती रेल्वेने नागपुरात आली.त्यानंतर मुलीचे समुपदेशन करून पथकाने तिला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!