- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात बडे उद्योग धंदे नसल्याने सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा व जिल्ह्यात उद्योग व्हावेत,अशी आमची इच्छा आहे.पण,उद्योगधंद्याच्या नावाखाली आमच्या पूर्वजांनी ज्याच्या भरवशावर अख्खे आयुष्य काढले,त्यातच आम्ही व आमची पुढील पिढी ज्याच्या भरवशावर राहणार, अश्या शेत जमिनी जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड सारख्या बड्या उद्योगांना देणे हे कितपत योग्य आहे; असे करून शासन काय साध्य करू पाहते.विकासाच्या नावाखाली बाता मारणे शासनाने सोडावे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट)
देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी परखड मत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावणाऱ्या कंपनी विरोधात जन आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.
देसाईगंज तालुक्यातील खासगी व सरकारी अशी एकूण २ हजार ३०३ हेक्टर जमीन जिंदाल स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड सारख्या बड्या उद्योगांना देण्याच्या शासनाच्या हालचालींना वेग आला आहे.यात कुरुड,कोंढाळा,नैनपुर,तुळशी, कोकडी,काही प्रमाणात देसाईगंज शहर व इतर क्षेत्र भू-संपादित करण्यात येणार आहे.त्यामुळे ज्या शेत जमिनी शेतकऱ्यांच्या एकमेव आधार आहेत,त्या उद्योगांना देणे म्हणजे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे आहे.माहितीनुसार,कंपनी एकाला नोकरी वा काही लाख रुपयांची रक्कम देणार,पण अशी धन- दौलत किती दिवस पुरणार आहे.स्थायी आणि अस्थायी यात फरक आहे.मिळणाऱ्या मोबदल्यावर आम्ही लवू-लवू खाणार,पण उद्याचे भविष्य काय?शासनाला उद्योग धंद्याची इतकीच चिंता आहे,तर ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहेत,अश्या ठिकाणी वा जिथे कुठलाही अधिवास नाही,अश्या जागा शोधून त्या ठिकाणी उद्योग उभारा, उद्योग धंद्यांना आमचा विरोध मुळीच नाही.मात्र,ज्यामुळे आमचे अनादिकाळापासून सुजलाम-सुफलाम झाले व पुढील काळातही सुजलाम-सुफलाम होणार,अश्या ठिकाणी उद्योगांचा विचार करणे हे कदापिही सहन करणार नाही,यासाठी येत्या काळात मोठा जन आंदोलन उभारू व शासनाला त्यांची जागा दाखवू,असे परखड मत क्षितिज उके यांनी व्यक्त केले आहे.
- Advertisement -

