Wednesday, June 3, 2026
Homeचंद्रपूर१३ वर्षीय शाळकरी मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला…

१३ वर्षीय शाळकरी मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये थरारक घटना घडली असून एक १३ वर्षाचा मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहत असून बरेच पुल पाण्याखाली गेले आहेत. नागभीड तालुक्यात विलम या गावामध्ये पूर आला होता.पूर पाहण्यासाठी रुणाल बावणे वय १३ वर्षे हा गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पूलाकडे गेला होता. यावेळी पूल ओलांडताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेला.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने त्याठिकाणी उपस्थित होते.पाण्याचा वेग पाहता पाण्यात उडी मारण्याचे कोणीही धाडस केले नाही.गावातील काही तरुणांनी पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला,पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होऊन शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!