Wednesday, September 23, 2026
Homeनागपूर१० वर्षीय मुलगा वाढदिवसासाठी रुसला अन् घर सोडून पळाला..! - आई-वडिलांच्या पायाखालची...

१० वर्षीय मुलगा वाढदिवसासाठी रुसला अन् घर सोडून पळाला..! – आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- ‘मुले देवाघरची फुले’ असे मानून आई- वडील आपल्या मुलांची जोपासना करतात.मात्र,नव्या पिढीची मुले ‘ऐकावे जनाची अन् करावे मनाची’ अश्या मनःस्थितीची झाल्याने आई-वडिलांची चिंता वाढलेली दिसून येते.असाच काहीसा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.एका दहा वर्षीय मुलाने त्याचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून रुसला आणि घर सोडून पळाला.त्यामुळे आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकून एकच धांदल उडाली होती.पोलिसांनी तत्परतेने त्याचा युद्धपातळीवर शोध घेतला.इतकेच नाही तर केक कापून त्याचा वाढदिवसदेखील साजरा केला.वाठोडा पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.संबंधित १० वर्षांचा मुलगा हा वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो.त्याचा काल गुरुवारी वाढदिवस होता. मात्र,सकाळी पालकांना वाढदिवस साजरा का केला नाही,असा सवाल त्याने केला व त्यावरून तो संतापला.त्या रागातच तो सकाळी ११ वाजता घराबाहेर पडला.त्याच्या घरच्यांनी खूप शोध घेतला.मात्र,तो कुठेच न आढळल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांनी वाठोडा पोलिस ठाण्यात याची माहिती दिली.पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली.पोलिसांनी त्याचे फोटोदेखील शेअर केले. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर परिसराजवळ बीट मार्शल शशिकांत बक्कल, शैलेंद्रसिंग यांना १० वर्षीय मुलगा आढळला. पोलिस त्याला वाठोडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले.तेथे त्याच्या आई-वडिलांनादेखील बोलविण्यात आले.मुलाला पाहून पालकांचा बांधच फुटला.पोलिसांनी लगेच केकचीदेखील व्यवस्था केली व त्याच्या घरी पोहोचले.त्याच्या घरासमोरच केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करून त्याची समजूत काढली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!