- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र घरगुती वापराचे गॅस सिलेंडर हॉटेल,बार,ढाबे,टी-शॉप, चिकन सेंटर तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जात आहेत.घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गॅस पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होत असतांनाही काहीजण ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पुरवठा विभागाने धडक मोहीम राबवून तब्बल ३३ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरपना व गडचांदूर शहरातील विविध भागांतून अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी अन्न व पुरवठा विभागाकडे करण्यात आल्या होत्या.शासनाच्या अनुदानाचा गैरफायदा घेत व्यावसायिक वापर करून महसूल बुडवला जात असल्याने,निरीक्षण अधिकारी व त्यांच्या पथकाने पूर्वसूचना न देता अचानक धाडी टाकत व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली.या धडक कारवाईदरम्यान शहरातील प्रमुख बाजारपेठ,वर्दळीचे चौक,हॉटेल पट्टा व इतर भागांत तपासणी करून अनेक नामांकित हॉटेल्स,बार,ढाबे,टी-शॉप व चिकन सेंटरमधून घरगुती वापरासाठी असलेले एकूण ३३ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.घरगुती वापराचे गॅस व्यवसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जात असेल,तर अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी सदरची मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे,सातत्याने आणि कठोरपणे राबवली जाईल,असे कोरपना तहसील कार्यालयाच्या अन्नपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

