Thursday, June 25, 2026
Homeभंडाराहॉटेलमध्ये पेपर वाचत असतांनाच अचानक खाली कोसळला; दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत पावला..

हॉटेलमध्ये पेपर वाचत असतांनाच अचानक खाली कोसळला; दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत पावला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-प्रशासनाच्या वतीने सर्वत्र भर दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडू नये,महत्वाचे कामच असेल तर उन्हात जातांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करणे,पुरेसे पाणी पिणे आणि हलके कपडे वापरणे आदी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यातच,सध्या उन आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरू असल्याने पाऊस संपताच आणखी प्रखर उन जाणवत आहे.त्यामुळे उष्माघात होऊन अचानकपणे मृत्यू होण्याच्या घटना राज्याच्या विविध भागात उघडकीस येत आहेत.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेल्याची घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,४७ वर्षीय इसम हॉटेलमध्ये पेपर वाचत असतांनाच अचानकपणे खाली कोसळला.लागलीच उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतांना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावच्या बसस्थानक परिसरात काल बुधवारच्या भर दुपारी घडली.प्रकाश आत्माराम मेंढे वय ४७ वर्षे, रा.ढोलसर,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे मृतकाचे नाव असून ते गावच्या बसस्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये पेपर(वृत्तपत्र)वाचत होते.त्याचवेळेस सदरची दुर्दैवी घटना घडली.प्राथमिक तपासणीत प्रकाश मेंढे यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दुपारच्या सुमारास बाहेर पडतांना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!