Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरस्वगावी जातांना उभ्या ट्रकला दुचाकी धडकली; दुचाकीस्वार जागीच ठार..

स्वगावी जातांना उभ्या ट्रकला दुचाकी धडकली; दुचाकीस्वार जागीच ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-दुचाकीने स्वगावी निघालेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा ‘नो पार्किंगमध्ये’ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी वाहन मागेहून जोरदार धडकल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्याच्या करंजी एमआयडीसीजवळ रस्त्यालगत घडली.अपघातात मनोज भुरेवार वय ४५ वर्षे,रा.धानापूर,ता.गोंडपिपरी,जि.चंद्रपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करीत संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला. यामुळे मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे पथकासह घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.करंजी एमआयडीसी जवळील रस्त्यालगत ‘नो पार्किंग’ मध्ये एमएच ३४ बीजे १२३१ क्रमांकाचा ट्रक उभा होता.त्याचवेळेस,मनोज भुरेवार हे दुचाकीने स्वगावी निघाले होते.जात असतांनाच दुचाकी ट्रकला मागून धडकली.धडक बसताच मनोज भुरेवार हे जागीच ठार झाले.अपघातामुळे नागरिक रस्त्यावर उतरले आणि एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या जड वाहनांवर कारवाईची मागणी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!