Tuesday, July 28, 2026
Homeमुंबईविश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित..

विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-देशाची आण,बाण आणि शान असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काल रविवारी खेळल्या गेलेल्या यंदाच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत न्यूझिलंड संघाचा पराभव करून तब्बल ९६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.भारतीय संघाने या विजयासह तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश बनला आहे. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी करणारा पहिला देशही भारत बनला आहे. त्यामुळे,भारतीय क्रिकेट संघाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याने आज,सोमवार ९ मार्च रोजी राज्य विधिमंडळात ट्वेंटी-२० विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करतांना भारताच्या विजयात मोलाचे योगदान करणाऱ्या सर्वच खेळाडूंचे कौतुक केले.या विजयामुळे टी-२० विश्वचषकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे,असे ते म्हणालेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदाचा प्रस्ताव मांडला.ते म्हणाले,आज सभागृहात भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करतांना मला अतिशय आनंद वाटत आहे. अभिमान वाटत आहे.कर्णधार सूर्यकुमार यादव हे आपल्या मुंबईचे आहेत.शिवम दुबेही मुंबईचे आहेत. मुंबईने अनेक महान खेळाडू भारताला दिलेत.आज आपल्या गावातील सामान्य खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.यातील अनेक खेळाडू अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेत.ते आज खेळाचे व देशाचे नाव मोठे करत आहेत.मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदनाचा प्रस्ताव पास करून त्याची एक प्रत ही आपल्या भारतीय संघाला पाठवावी अशी विनंती करतो आहे;असे ते म्हणाले.त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव सर्वानुमते पारित झाल्याचे घोषित करून त्याची प्रत संबंधितांना पाठवण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!