- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-वर्ध्यातील ‘फिनिक्स अकॅडमी’चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य करणे चांगलेच भोवले आहे.३१ जुलै २०२६ रोजी “आरक्षण हटाव” या विषयावर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडीओत त्यांनी एका विशिष्ट समाजाविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला.त्यामुळे समाजात तेढ निर्माण करून समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार शहर पोलिसांत अजय शंकरराव डोंगरे वय ३० वर्षे, रा.सिंदी मेघे,वर्धा यांनी दिली होती.त्यावरून,पोलिसांनी नितेश बाळकृष्ण कराळे रा.म्हाडा कॉलनी,वर्धा यांच्या विरूद्ध शहर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतरही,त्यांनी एका व्हिडीओमध्ये न्यायव्यवस्थेबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले.याप्रकरणातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.संबंधित दोन्ही प्रकरणे दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते.त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांना वेगवेगळ्या दिशेने त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले होते.दरम्यान,काल गुरुवारच्या मध्यरात्री सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास त्यांना अमरावती येथील तपोवन परिसरातून ताब्यात घेण्यात आले.पोलिसांचे पथक त्यांना घेऊन वर्धेत पोहोचले व नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराळे यांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान, न्यायालयात पोलिसांनी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.मात्र,न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, कराळे मास्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते असून ते आपल्या विशेष शैलीत सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करून प्रसारित करत असतात.विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे (एमपीएससी)मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.
- Advertisement -

