Sunday, June 21, 2026
Homeदेसाईगंजसामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारेंनी ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन भीम सैनिकांसोबत केला...

सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारेंनी ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन भीम सैनिकांसोबत केला साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरात काल,सोमवारी ६८ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन शहराच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावन भूमी असलेल्या दिक्षाभुमी येथे हजारोच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
दिक्षाभुमी येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात.६८ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून संपूर्ण वार्डातून भीमरॅली काढण्यात आली.शहरासह परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.अशातच सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बौद्ध बांधवांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करून भीम सैनिकांसमवेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या उत्साहात सहभागी झाले होते.
खेमराज नेवारे गेल्या अनेक वर्षांपासून भीम रॅली मध्ये सहभाग होणाऱ्या बौद्ध बांधवांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करीत असतात.यातून त्यांची बौद्ध बांधवाविषयी असलेली तळमळ, आपुलकी, प्रेम, आत्मीयता प्रकर्षाने दिसून येते.६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी खेमराज नेवारे सह वैभव परशुरामकर, सलमान पठाण,नरेश वासनिक,पत्रकार दिलीप कहूरके,निखिल मेश्राम, प्रकाश सांगोळे,सुधीर मेश्राम,हितेंद्र गजघाटे, तुषार रहाटे,बौद्ध उपासक, उपासिका तसेच देसाईगंज शहरातील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!