Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीऐनवेळी उमेदवारी न मिळालेले इच्छुक बंडखोरी करणार की काय? -सर्वसामान्यांना महागाईची चिंता;...

ऐनवेळी उमेदवारी न मिळालेले इच्छुक बंडखोरी करणार की काय? -सर्वसामान्यांना महागाईची चिंता; तर इच्छुकांना आपले नाव यादीत केव्हा येईल याची चिंता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.अशातच आता सर्वसामान्यांना महागाईची चिंता,तर इच्छुकांना आपले नाव यादीत केव्हा येईल याची चिंता सतावू लागली आहे.दुसरीकडे इच्छुकांची संख्या प्रत्येक पक्षात वाढलेली पाहायला मिळत आहे.एकंदर आतापासूनच इच्छुक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात गुडघ्याला बार्शिंग बांधून बसल्याचे पाहावयास मिळत आहेत.
सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या फुगलेली दिसत आहे.उमेदवारीसाठी इच्छुक जिवाचा आटापिटाही करीत आहेत.काही इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीपासूनच मतदारसंघातील गावांचे दौरे सुरू केले आहेत. मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेणे,त्यांचे प्रश्न सोडविणे,त्यांच्या समस्या जाणून घेणे,आदी कामे ते नेटाने करू लागले आहेत.काही इच्छुक तर उमेदवारी मिळो अथवा न मिळो,आपण निवडणूक लढणारच,असे ठामपणे सांगताना दिसून येत आहेत.त्यादृष्टीने त्यांनी भेटीगाठींवर भरही दिला आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे इच्छुक व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.ऐनवेळी उमेदवारी न मिळालेले इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरांचे पीक प्रत्येक पक्षात पाहावयास मिळणार आहे.उमेदवारी न मिळालेले इच्छुक पक्षनिष्ठा पाळतात की आपली वेगळी चूल मांडतात,हे येणारा काळच सांगणार आहे.
विधानसभेच्या तिकिटासाठी राजकीय पक्षात रस्सीखेच सुरू असून,उमेदवार निवडण्यामध्ये पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राजकीय वातावरण तापले आहे.महायुती व महाविकास आघाडी उमेदवार निवडताना दक्षता घेत आहेत.सध्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत आहेत.काहीजण तर निवडणुका आल्या की घराबाहेर आपल्याला पक्षाची उमेदवारी जाहीर होईल,असे इच्छुक आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत.महायुती व महाविकास आघाडीमध्ये तिकिटासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असल्याने सर्वसमावेशक उमेदवाराची निवड करणे पक्ष श्रेष्ठींसाठी कसोटी ठरण्याची चिन्हे आहेत.
तोडीस तोड असणारा उमेदवार पक्षश्रेष्ठी शोधत आहेत.उमेदवारीसाठी मुंबईच्या चकरा वाढलेल्या आहेत.सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.तसेच मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचीही मते जाणून घेतली जात आहेत.आता फक्त उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे.विधानसभा मतदा- रसंघात अनेक प्रश्न आहेत; हे प्रश्न आपणच सोडवू शकतो असे इच्छुक मतदारांना सांगत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!