Sunday, August 30, 2026
Homeभंडारासहलीच्या आनंदावर विरजण; एकाचा जलाशयात बुडून मृत्यू..

सहलीच्या आनंदावर विरजण; एकाचा जलाशयात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रंगपंचमीनिमित्त नागपूरहून सहलीचा आनंद लुटण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील रावणवाडी जलाशयात गेलेल्या तरुणांची बोट उलटून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.तब्बल चोवीस तासांच्या शोधमोहिमेनंतर आज,बुधवार ४ मार्च रोजी तरुणाचा  मृतदेह जलाशयात सापडला.सौरभ मेहरा वय ३० वर्षे, रा.धरमपेठ,नागपूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
नागपूरहून काही तरुणांचा गट काल मंगळवारी सहलीसाठी रावणवाडी जलाशयावर गेला होता.विशेष म्हणजे,होळी आणि रंगपंचमीनिमित्त जलाशय पर्यटकांसाठी बंद असतांनाही,आदेशांचे उल्लंघन करून हे पर्यटक जलाशयात उतरले होते.जलाशयात बोटिंग करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बोट अनियंत्रित झाल्याने ती अचानक उलटली.सौरभला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला,तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी पोहत-पोहत
किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले.घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशनचे एपीआय धनंजय पाटील पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.स्थानिक मच्छीमार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोधमोहिम राबविण्यात आली.अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत आज सकाळी शोधमोहीम सुरू केली असता सौरभचा मृतदेह सापडला.घटनेने मेहरा कुटूंबीय शोकसागरात बुडाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!