Friday, October 16, 2026
Homeकुरखेडाअखेर आमदार मसरामांच्या पाठपुराव्याला यश; आता कुरखेडा व कोरची मार्गावरून धावणार नागपूर...

अखेर आमदार मसरामांच्या पाठपुराव्याला यश; आता कुरखेडा व कोरची मार्गावरून धावणार नागपूर बस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-आमदार रामदास मसराम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागणीचा सकारात्मक विचार करून नागपूर-कोरची,कोरची-नागपूर तसेच नागपूर-कुरखेडा, कुरखेडा-नागपूर या बससेवा येत्या,शुक्रवार ६ मार्च पासून कुरखेडा व कोरची मार्गावरून नियमितपणे धावणार असून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याचे दिसून येत आहे.यामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात स्वतंत्र बस डेपो उभारण्यात यावा,तसेच कुरखेडा-नागपूर आणि कोरची-नागपूर बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली होती. यासंदर्भात बुधवार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झूम मीटिंगद्वारे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व जिल्हाधिकारी यांच्या अधक्षतेखाली बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)अंतर्गत कुरखेडा येथे बस डेपोची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.त्याचबरोबर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नागपूर येथे शिक्षण,आरोग्य व शासकीय कामांसाठी जावे लागते. मात्र,थेट बससेवेअभावी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार मसराम यांनी निदर्शनास आणून दिले होते.त्यानुसार,येत्या ६ मार्चपासून
नागपूर-कोरची मार्गावरील बस नागपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटून सायंकाळी ६.५० वाजता कोरची येथे पोहोचेल.सदर बस कोरची येथे मुक्कामास राहील. त्यानंतर कोरचीवरून सकाळी ६.३० वाजता सुटून नागपूर येथे १०.३५ वाजता पोहोचेल.
तसेच नागपूर-कुरखेडा मार्गावरील बस नागपूर येथून पहाटे ५.१५ वाजता सुटून सकाळी ८.२५ वाजता कुरखेडा येथे पोहोचेल.कुरखेडा वरून ही बस सकाळी ९ वाजता सुटून दुपारी १२.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
या बससेवेच्या सुरूवातीमुळे विद्यार्थी,शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रवासाची मोठी अडचण दूर होणार आहे.विशेषतः आरोग्य,शिक्षण आणि शासकीय कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.या निर्णयाबद्दल नागरिकांनी आमदार मसराम यांचे आभार मानले असून भविष्यातही अशाच विकासकामांना गती मिळावी,अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!