Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजसहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को ऑप.सोसायटी शाखा देसाईगंजच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम - जिल्हा परिषद...

सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को ऑप.सोसायटी शाखा देसाईगंजच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढाळाच्या आवारात वृक्षारोपण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज :- तालुक्यातीलकोंढाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात आज १७ जुलै २०२३ रोजी देसाईगंज शाखेच्या सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को ऑप.सोसायटीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संतांच्या म्हणी प्रमाणे आपल्या जीवनात वृक्षांचे महत्त्व किती आवश्यक आहे; हे उन्हा-तान्हात काम करणाऱ्यांना माहीत आहे.वृक्षांपासून मानवी शरीरास आवश्यक असणारे ऑक्सिजन मिळत असते.वृक्ष लागवड ही काळाची गरज झाली आहे.वृक्ष असतील तर तुम्ही – आम्ही व संपूर्ण जनजीवन या धरतीवर असणार; यासाठी दरवषी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.याच उदात्त हेतूने सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को ऑप. सोसायटी शाखा देसाईगंजच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेऊन शाळेमध्ये विविध मान्यवर,पदाधिकारी,शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण प्रसंगी सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को ऑप. सोसायटी देसाईगंज शाखेचे शाखा व्यवस्थापक  चेतनकुमार भोंडे,कोंढाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन सेलोटे,शाळेचे मुख्याध्यापक अनिल मुलकलवार,शिक्षक योगेश ढोरे,बँकेचे BDO, BDE व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!