Monday, September 28, 2026
Homeदेसाईगंजसर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. - आज जुनी...

सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. – आज जुनी वडसा येथे विशेष शिबिराचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पुरवठा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यात सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’ सुरू करण्यात आले आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्या आदेशानुसार,तर निरीक्षण अधिकारी युवराज बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानांतर्गत मौजा-जुनी वडसा येथील रास्त भाव दुकान परिसरात आज,सोमवार २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष ई-केवायसी(E-KYC)शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी व मोबाईल सीडिंग केले जाणार आहे.ज्या लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही,त्यांना योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज करता येणार आहे.यासाठी आवश्यक कागदपत्रे-शिधापत्रिका (रेशन कार्ड),आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.या शिबिराचे ठळक मुद्दे म्हणजे,ई-केवायसीमुळे आपल्या रेशनकार्डचे सत्यापन होईल.सर्व पात्र लाभार्थ्यांचे नाव रेशनकार्ड मध्ये कायम राहतील.ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही.त्यामुळे,आजच आपली ई-केवायसी करून घ्या आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करा.जुनी वडसा येथील सर्व शिधापत्रिकाधारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भर्रे यांचेसह शुभम सुरजुसे,रक्षा बघेल,मंगला बोरकर,अमोल जोहरी, रविंद्र भिलकर,रवी हेडाऊ,विशाल पत्रे,भास्कर ढोरे,कादर साबरी,वामन पगाडे,पवन निकम, दिनकर गजभिये, श्यामराव ढोरे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विहिरीतून पाणी काढणार तितक्यात अचानकपणे पाय घसरल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.दिवसभर शेतातील कामे आटोपून विहिरीतून पाणी काढणार तितक्यात  अचानकपणे पाय घसरून तोल गेला...

अखेर बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; बँकांचे कामकाज राहणार नियमित सुरू..

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील बँक कर्मचारी आज, सोमवार २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपावर जाणार होते.मात्र,संपाच्या पूर्वसंध्येला काल रविवारच्या रात्री इंडियन बँक्स...

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!