Thursday, September 24, 2026
Homeनागपूरसतत मोबाइल पाहण्यामुळे आईने रागावले; मुलाने घरच सोडले.. - अखेर गुन्हे शाखेच्या...

सतत मोबाइल पाहण्यामुळे आईने रागावले; मुलाने घरच सोडले.. – अखेर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने लावला शोध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कुणाच्याही आई-वडिलांना नेहमीच वाटत असते की,आपली मुले सुशिक्षित होऊन आई- वडिलांचे मोठे नाव लौकीक करावीत; त्यासाठी सर्वकाही पणाला लावून सांभाळ करीत असतात.अशातच आजची तरुणाई छोट्या-छोट्या कारणांसाठी टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्यांना त्रास देत असल्याच्या घटना हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.
आई-वडिलांनी मोबाइलसाठी रागावल्यामुळे एका १६ वर्षीय मुलाने घरून पलायन केले.परंतु गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन केले.
वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ३९ वर्षीय व्यक्तीचा १६ वर्षीय मुलगा १२ वीला शिकतो.तो सतत मोबाइल पाहत असल्यामुळे त्याच्या आईने त्याला फटकारले.त्याचा राग मनात धरून तो १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घरी कोणाला काहीही न सांगता निघून गेला.त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असावे, अशा तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक तपास करून या अल्पवयीन बालकाचा शोध घेतला असता तो बिडगाव येथे आढळला.त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर या अल्पवयीन बालकाला वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे आणि त्यांच्या पथकाने केली.रागाने घरून निघून जाण्याची अल्पवयीन बालकाची ही दुसरी वेळ आहे. महिनाभरापूर्वीही तो घरच्यांनी रागावल्यामुळे निघून गेला होता.त्यावेळी दोन दिवस त्याने एका कॅन्टीनमध्ये काम केले होते.लहान असतांना त्याला कावीळ झाला होता.तेव्हापासून तो मतिमंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!