Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूरसंतापलेल्या आमदारांनी चक्क अधिकाऱ्यांनाच कार्यालयात बंद करून ठोकले कुलूप…….

संतापलेल्या आमदारांनी चक्क अधिकाऱ्यांनाच कार्यालयात बंद करून ठोकले कुलूप…….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असल्याने हिंस्र प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करतात.यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत.दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळेबंद आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता.परंतु सरकारकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हे आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती.या मागणीला सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने संतापलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा काढला.चक्क अधिकाऱ्यांनाच कार्यालयात बंद करून कुलूप ठोकले.त्यानंतर ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध केला.

यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.परंतु,आश्वासन पूर्ण न केल्यास वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांच्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूपबंद आंदोलन करण्याचा अल्टिमेटम आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला.सदर आंदोलन प्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,वरोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर,शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे,भद्रावती काँग्रेस शहराध्यक्ष सूरज गावंडे,माजी नगरसेवक राजू महाजन,वरोरा तालुका महिलाध्यक्ष ऐश्वर्या खामनकर, मोनू चिमूरकर,प्रमोद मगरे, बसंत सिंग,नीलेश भालेराव,मनोहर स्वामी,फिरोज पठाण,प्रमोद काळे, पुरुषोत्तम पावडे,रवींद्र धोपटे,संजय घागी,गणेश घागी, रत्नमाला अहिरकर, माधुरी चिकटे,सविता सुपी आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!