Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजश्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळ बोळधा च्या वतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा......

श्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळ बोळधा च्या वतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा… -उत्कृष्ट नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धकांना बक्षीसचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- देसाईगंज तालुक्याच्या बोळधा गावातील श्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळाच्या वतीने आज,३ सप्टेंबरला श्री दत्त मंदिर तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान या ठिकाणी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तान्हा पोळा दिनाचे औचित्य साधून श्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार गावातील चिमुकल्यांनी नंदी सजावटीसह सुंदर अशी वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग नोंदवून घेतला.मंडळाच्या वतीने प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक असे तीन रोख पारितोषिक जाहीर केले होते. उत्कृष्ट नंदी सजावट मध्ये प्रथम क्रमांक-विपुल नवनाथ नेवारे ७०१ रुपये,द्वितीय क्रमांक-जियान एकनाथ मेश्राम ३०१ रुपये तर तृतीय क्रमांक-नितांत दिपक कामळे २०१ रुपये यांना देण्यात आले.तसेच उत्कृष्ट वेशभूषा परिधान करणारे प्रथम क्रमांक-नमन लोकेश गायकवाड ५०१ रुपये,द्वितीय क्रमांक-लावण्या ओमप्रकाश मेश्राम ३०१ रुपये तर तृतीय क्रमांक- स्वरा शुशांत गायकवाड २०१ रुपये यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रुपी बक्षीस वितरीत करण्यात आले.
यावेळी देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती
मोहन पा.गायकवाड,डॉ.पुरुषोत्तम गायकवाड, ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेन्द्र गायकवाड,पोलीस पाटील खुशाल मस्के,तंटामुक्त समिती अध्यक्ष सुखदेव मेश्राम,उपस्थित मान्यवर तसेच ग्रामस्थांच्या  उपस्थितीत तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वांनी तान्हा पोळा निमित्त सहकार्य केल्याने श्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळ बोळधा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!