- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत युवक-युवतींना प्रशिक्षण कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार ६ हजार,८ हजार व १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.त्यानुसार आता ज्यांची निवड करण्यात आली आहे; अशांची चांदीच-चांदी आहे.लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांना देखील मदतीसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून जवळपास १ लाख १० हजार प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यापैकी ६० हजारांहून अधिक युवा खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले असल्याची माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
मंगल प्रभात लोढा म्हणाले की,आत्तापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून यातील ८ हजार १७० आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रुजू झालेल्या युवकांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
या योजनेबाबत अधिक माहिती देताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की,भविष्यातील रोजगाराची आव्हाने लक्षात घेता आतापासूनच कार्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून युवकांना रोजगारक्षम बनवण्याचा निर्धार आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,या योजनेतून सरकारी तसेच खाजगी आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
- Advertisement -

