- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- देसाईगंज तालुक्याच्या बोळधा गावातील श्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळाच्या वतीने आज,३ सप्टेंबरला श्री दत्त मंदिर तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान या ठिकाणी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तान्हा पोळा दिनाचे औचित्य साधून श्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार गावातील चिमुकल्यांनी नंदी सजावटीसह सुंदर अशी वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग नोंदवून घेतला.मंडळाच्या वतीने प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक असे तीन रोख पारितोषिक जाहीर केले होते. उत्कृष्ट नंदी सजावट मध्ये प्रथम क्रमांक-विपुल नवनाथ नेवारे ७०१ रुपये,द्वितीय क्रमांक-जियान एकनाथ मेश्राम ३०१ रुपये तर तृतीय क्रमांक-नितांत दिपक कामळे २०१ रुपये यांना देण्यात आले.तसेच उत्कृष्ट वेशभूषा परिधान करणारे प्रथम क्रमांक-नमन लोकेश गायकवाड ५०१ रुपये,द्वितीय क्रमांक-लावण्या ओमप्रकाश मेश्राम ३०१ रुपये तर तृतीय क्रमांक- स्वरा शुशांत गायकवाड २०१ रुपये यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रुपी बक्षीस वितरीत करण्यात आले.
यावेळी देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती
मोहन पा.गायकवाड,डॉ.पुरुषोत्तम गायकवाड, ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेन्द्र गायकवाड,पोलीस पाटील खुशाल मस्के,तंटामुक्त समिती अध्यक्ष सुखदेव मेश्राम,उपस्थित मान्यवर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वांनी तान्हा पोळा निमित्त सहकार्य केल्याने श्री गुरुदेव दत्त सांप्रदायीक मंडळ बोळधा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
- Advertisement -

