Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजशेतीच्या दुसऱ्या हंगामाची लगबग; तरीही शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेतच.. - तात्काळ बोनस जमा...

शेतीच्या दुसऱ्या हंगामाची लगबग; तरीही शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेतच.. – तात्काळ बोनस जमा करा- ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस देण्याचा शासन निर्णय २५ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला.शासन निर्णय निर्गमित करून महिनाभराचा कालावधी लोटूनही बोनस देण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नसल्याने ऐन हंगामाच्या वेळेस आर्थिक मदत मिळत नसेल तर अश्या बोनस मिळण्याचा फायदा काय? शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ बोनस जमा करावा,अशी मागणी ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या कमी भावामुळे दिवसेंदिवस धानाची शेती तोट्यात चालली आहे.शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने प्रति हेक्टर २० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचे विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते.सुरुवातीला आश्वासन दिले व नंतर शासन निर्णय निर्गमित केले.बोनासची रक्कम आज मिळेल,उद्या मिळेल,म्हणता-म्हणता महिना लोटून गेला तरीही बोनस जमा होण्याचे नावच घेत नाही.
जिल्हाभरातील शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षा करीत आहेत.त्यासाठी याकरिता ते बँकेत जाऊन चौकशी सुद्धा करीत आहेत.दुसऱ्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होत आहे.खरीप पिकाची लागवड करण्याचा आता केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे.या पिकांचे नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.येत्या पंधरा दिवसानंतर बियाणे खरेदीची लगबग वाढणार आहे. ज्या भागात अवकाळी पाऊस झाला त्या भागात शेती नांगरणीला सुरुवात झाली असून हा खर्च भागविण्यासाठी शेतकरी प्रोत्साहन रकमेची प्रतीक्षा करीत आहेत.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन त्वरित तात्काळ त्यांच्या खात्यात बोनस जमा करावे,अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी पत्रकातून केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!