- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील
आंधळी गावात २०१७ मध्ये उभारण्यात आलेल्या बीएसएनएल दूरसंचार मनोऱ्याचा बॅटरी बॅकअप संच मागील काही वर्षांपासून निकामी झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाला की,मनोऱ्याची सेवा थांबते आणि संपूर्ण मोबाईल सेवा ठप्प होते.याचा फटका सामान्य नागरिकांसह शासकीय व निमशासकीय कार्यालये,शाळा,ग्रामपंचायत आणि विद्यार्थ्यांना बसत आहे.वारंवार तक्रारी करूनही बीएसएनएल प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या संदर्भात उपजिल्हा प्रबंधक बीएसएनएल कार्यालय गडचिरोली व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले असून,या समस्येवर तातडीने निर्णय घेण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
अप्रव भैसारे,आंधळी ग्रामपंचायत उपसरपंच👇
ग्राहकांकडून सेवा कर (सर्विस टॅक्स)आकारून देखील योग्य सेवा दिली जात नाही,ही थेट फसवणूक आहे.प्रशासनाने त्वरीत नवीन बॅटरी बॅकअप संच उपलब्ध करून दिला नाही,तर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.
- Advertisement -

