Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरशेती नसलेल्या व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून अनुदान लाटले; ग्रामसेवक निलंबित.

शेती नसलेल्या व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून अनुदान लाटले; ग्रामसेवक निलंबित.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ज्यांच्या नावे कुठल्याही प्रकारची शेती नाही तसेच ज्यांचे अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाले नाही, अश्या बनावट व्यक्तींच्या नावावर तब्बल ४ लाख १८ हजार ६९० रूपये इतके अनुदान लाटण्याचा प्रकार उघडकीस येताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पोंभुर्णा तालुक्यातील आदर्श ग्राम घाटकूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांना निलंबित केले आहे.
शासनाकडून वर्ष २०२३-२४ मध्ये अतिवृष्टी व पीक नुकसानीचे पंचनामे करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता अनुदान मिळाले होते.त्यानुसार, पंचनामे तयार करण्यात आले.मात्र,घाटकूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांनी
शेती पंचनाम्यातील गैरव्यवहार प्रकरणात सातबारा नसलेल्या ९ अपात्र लाभार्थ्यांसाठी चुकीचे पंचनामे तयार केले.विशेष म्हणजे,ज्यांच्या नावावर शेती नाही, अश्यांनाही तसेच तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून वाढीव आराजी दाखवली व त्यांना शासकीय अनुदान दिल्याचा बनाव करून स्वतःच अनुदान लाटले.याबाबत सुजाण नागरिकांनी तक्रार नोंदवली.प्रकरणाची चौकशी झाली आणि चौकशीअंती पीक नुकसानीच्या पंचनाम्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने घाटकूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खुशाब मानपल्लीवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!