Wednesday, September 23, 2026
Homeदेसाईगंजशिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता-देसाईगंज येथील घटना..

शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता-देसाईगंज येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :-शहरातील आदर्श न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी मंगळवारला शाळेतून बाहेर निघाल्यानंतर अचानक गायब झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी देसाईगंज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

एक विद्यार्थी ही सातव्या वर्गात तर दुसरी मुलगी दहाव्या वर्गात शिकत आहे.मंगळवारला सकाळी त्या शाळेत गेल्या होत्या.परंतु शाळा सुटल्यानंतर त्या घरी पोहोचल्या नाहीत.यासंदर्भात शाळा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,दोघीही दुपारी १ वाजताच्या सुमारा अल्प विश्रांतीच्या काळात बाहेर पडतांना दिसून आल्या.

याबाबत कुटुंबीयांनी देसाईगंज पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी पोलिस निरीक्षक किरण रासकर यांना विचारणा केली असता,दोन्ही विद्यार्थिनी शाळेतून निघाल्यानंतर घरी पोहोचल्या.कपडे बॅगमध्ये भरून घराबाहेर निघाल्या.तेव्हापासून त्या बेपत्ता असल्याची माहिती दिली.बेपत्ता दोन्ही विद्यार्थिनींचा शोध देसाईगंज पोलीस प्रशासन घेत आहेत.एकाच वॉर्डात शेजारीच राहणाऱ्या दोन विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!