नागपूर :-जिकडे-तिकडे मिलावटीच्या व भेसळीच्या घटना आपण ऐकलेल्या व वाचलेल्या असेलच,पण गेल्या सहा वर्षांपासून चक्क शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारीच बनावट असतील तर..! किती हास्यास्पद तितकीच गंभीर स्वरूपाची बाब नागपूर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये नुकतीच उघडकीस येऊ लागली आहे.महत्वाचे म्हणजे,सदरचा प्रकार हा शालार्थ पोर्टलवरील माहितीत त्रुट्या आढळल्याने भांडाफोड झाल्याचे वृत्त आहे.हा मोठा स्कॅम सहा वर्षांपासून सुरू असून,अशा बनावट कर्मचाऱ्यांची संख्या ५०० च्यावर असण्याची आणि या फसवणूक प्रकरणात शिक्षण विभागातील वरिष्ठस्तराचे अधिकारी चौकशीच्या ‘रडार’वर असल्याचे सांगण्यात येत आहे.शासनमान्य शाळांच्या कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या ‘शालार्थ’ पोर्टलवर ऑनलाइन सादर करावी लागते.त्यानुसार शासनाकडून पगार काढले जातात.नागपूर जिल्ह्यातील काही शाळांच्या शालार्थ पोर्टलवरील माहितीत त्रुट्या आढळल्या.याची तपासणी केली असता हा सर्व घोटाळा पुढे आल्याचे बोलले जात आहे.२०१९ पासून अशाप्रकारे बनावट नाव व ओळख दाखवत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन भरली जात होती.अधिकाऱ्यांनी काही शाळा संचालकांशी संगनमत करून कर्मचाऱ्यांच्या बनावट आयडीद्वारे शासनाचा निधी उचल केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात ५८४४ अनुदानित शाळातही हा गोरखधंदा सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सरकारकडून गंभीर पावले उचलली जात असल्याचे बोलले जात आहे.त्यातच यात वरिष्ठ अधिकारीही रडारवर असून ‘ते’ अधिकारी कोण? ‘त्या’ शाळा कोणत्या? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
शालार्थ पोर्टलवरील माहितीत त्रुट्या आढळल्या अन् बनावट शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भांडाफोड झाला.. – सहा वर्षांपासून मोठा स्कॅम…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

