- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून राज्यात सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे.सदर सामाजिक समता सप्ताह ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली याच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन पार पडले. यावेळी डॉ.देवसुदन धारगावे उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकाच्या प्रतींचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करुन जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली कार्यालयातील बहुसंख्य अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

