Friday, September 4, 2026
Homeनागपूरअखेर अवैध वाळू उत्खनन प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदार निलंबित.. - विभागीय आयुक्तांच्या...

अखेर अवैध वाळू उत्खनन प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदार निलंबित.. – विभागीय आयुक्तांच्या अहवालावर ठरले होते अधिकाऱ्यांचे भवितव्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या तुमसर व मोहाडी तालुक्यात शासकीय रेती डेपोवर नियमांना बाजूला सारून आपलाच मनमानी कारभार चालवला जात आहे व परिसरात अवैध रेती तस्करी जोमाने सुरू असूनही अनेकांचे साटेलोटे उदयास आले असल्याचे नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्थानिक आमदारांनी मुद्दा उचलून धरल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय रेती डेपोंची मार्च २०२५ मध्ये नुकतीच चौकशी करण्यात आली होती.अर्थसंकल्पीय अधिवेशनात महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व एका सेवानिवृत्त महसूल अधिकाऱ्याचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली होती.महसूल मंत्र्यांनी आपल्या उत्तरात तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय रेती डेपोची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नागपूर महसूल विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मोका चौकशी करून संपूर्ण माहिती नुकतीच जाणून घेतली होती.सदरचे अधिकारी विभागीय आयुक्त नागपूर यांना अहवाल सादर करणार होते व त्यानंतर विभागीय आयुक्त सदर अहवाल हा राज्याच्या आयुक्तांना सादर करणार होते. त्यातच विभागीय आयुक्तांच्या अहवालावरच साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे भवितव्य ठरणार होते. अशातच नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत भंडारा जिल्ह्याच्या तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले हे दोघेही अधिकारी भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला.त्यानुसार राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज,बुधवारी ९ एप्रिल रोजी तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित केले आहे. महत्वाचे म्हणजे,भंडारा जिल्ह्याच्या तुमसर भागात गौण खनिज प्रकरणी नागपूर महसूल विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मोका चौकशी केली असता,पर्यावरण विभागाची अनुमती नसतांना वाळू घाटांमधून अवैध वाळूचे उत्खनन झाल्याचे आढळून आले.सदरचा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने सर्वंकष चौकशीअंती निलंबनाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!