Monday, September 21, 2026
Homeबीडव्यायाम करीत असलेल्या पाच तरुणांना एसटी बसने उडवले.. - तिघेजण ठार तर...

व्यायाम करीत असलेल्या पाच तरुणांना एसटी बसने उडवले.. – तिघेजण ठार तर दोघे जखमी; आज सकाळची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-सकाळच्या सुमारास पोलीस भरतीची तयारी करीत असलेले पाच तरुण रस्त्याच्या कडेला व्यायाम करीत असतांना एसटी बसने उडवल्याची घटना आज,रविवार १९ जानेवारीला बीड परळी मार्गावरील बीड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मोची पिंपळगाव फाट्यावर घडली.यात तिघेजण ठार तर दोघेजण जखमी झाले.राजुरी गावातील पाच विद्यार्थी हे सकाळी व्यायाम करण्यासाठी बीड परळी रस्त्यावर गेले असता बस क्रमांक-एम एच १४ बी टी १४७३ या बसणे पाच जणांना उडवले.यात ओम सुग्रीव घोडके वय १९ वर्षे, विराट बाब्रुवान घोडके वय १८ वर्षे,सुबोध बाबासाहेब मोरे वय १९ वर्षे सर्व रा.घोडके राजुरी,ता.बीड यांचा मृत्यू झाला असून दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्त,मांसाचा सडा पडला होता.बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली.घटनेची माहिती कळताच तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.परळी महामार्गावर झालेल्या अपघातात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरली असून बसचा मागच्या काचा फुटल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!