- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दहावी-बारावी बोर्डाच्या प्रवेश पत्रावर जातीचा उल्लेख करून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ काय साध्य करणार आहे; विद्यार्थ्यांना जात निहाय वर्ग खोल्यात बसवणार की काय? अश्या नाना तऱ्हेच्या संतप्त प्रतिक्रिया समाजातील सर्वच स्तरातून केल्या गेल्याने अखेर शिक्षण मंडळाने दिलगिरी व्यक्त करीत प्रवेश पत्रावर जातीचा उल्लेख नसणारी प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यानुसार आता बारावीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी २३ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने ही प्रवेश पत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.तर दहावीसाठीची प्रवेशपत्रे उद्यापासून उपलब्ध करून दिली जातील असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

