मुंबई :-अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.धारदार चाकूने सहा वार करून संधी साधून चोरटा पळाला होता. त्यामुळे चोराला शोधण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.अशातच हल्ल्यातील आरोपी आज,रविवार १९ जानेवारीला मुंबई पोलिसांच्या हाती लागला असून त्याला ठाणे परिसरातून अटक करण्यात आली आहे.मोहम्मद शहजाद वय ३० वर्षे असून तो बांगलादेशी नागरिकत्वाचा असल्याची माहिती पुढे आली आहे.पोलिसी खाक्यानुसार,तो चोरीच्या उद्देशानेच अभिनेता सैफ अली खानच्या घरी घुसला होता,अशी त्याने कबुली दिली आहे.चोराला ठाणे परिसरातून अटक करून मुंबईत आणल्या नंतर त्याला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलयाने त्याला पुढील तपासाकरीता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस कोठडी नुसार आणखी मोठे खुलासे पुढे येऊ शकतात,त्यामुळे सदरची कोठडी देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपी अटकेत; पाच दिवसांची पोलीस कोठडी…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

