Saturday, October 24, 2026
Homeचंद्रपूरविद्युत शार्ट सर्किटमुळे कापसाला लागली आग- कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील घटना

विद्युत शार्ट सर्किटमुळे कापसाला लागली आग- कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नितेश केराम/ कोरपना ता.प्र.

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील मौजा-कन्हाळगाव येथील घरात साठवणूक केलेल्या कापसाला विद्युत शार्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची घटना आज १५ एप्रिल ला शनिवारी सकाळी १० वाजता घडली.प्राप्त माहिती नुसार कन्हाळगाव येथील रामचंद्र झोलबा वासेकार यांच्या शेतातील कापूस वेचणी झाल्या नंतर त्यांनी कापूस जुन्या घरामध्ये साठवणूक करून ठेवला होता. 

आज दहा वाजताच्या दरम्यान अचानक विद्युत शार्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत जवळपास ५ क्विंटल कापूस,घराचे दरवाजे,कवेलू व टिनाच्या पत्र्याचे नुकसान झाले असून अंदाजे ५८ हजार  रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.सदर घटनेचा महसूल विभाग व पोलिसांनी पंचनामा केला.पंचनामा करतेवेळी तलाठी कमलवार पोलीस उपनिरीक्षक खेकाडे व गावातील पोलीस पाटील आदी उपस्थित होते.घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!