Wednesday, May 27, 2026
Homeआरमोरीविद्युत वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ अडकला एसीबीच्या जाळ्यात-आरमोरी येथील महावितरण कंपनीमध्ये होता...

विद्युत वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ अडकला एसीबीच्या जाळ्यात-आरमोरी येथील महावितरण कंपनीमध्ये होता कार्यरत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी(गडचिरोली) :- वीज जोडणी घेण्याकरिता सर्वे करून चार विद्युत खांब बसत असतांना ते कमी करून तीन विद्युत खांब करण्याच्या कामाकरिता तक्रारदाराकडून दीड हजार रूपयांची लाच स्वीकारताना आरमोरी येथील महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञास गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल,१४ जानेवारी २०२४ रोजी रंगेहाथ अटक केली आहे.महेंद्र डोमाजी बगडे वय ३६ वर्षे वरिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आरमोरी,असे अटक करण्यात आलेल्या लाचखोराचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला सोनपूर येथील सर्वे नं.२२ मध्ये वीज कनेक्शन घेण्याकरिता सर्वे करून चार खांब बसत होते.ते कमी करून ३ विद्युत खांब बसविण्याचा मोबदला म्हणून आरोपी महेंद्र बगडे याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तक्रारदाराने दीड हजार रूपये देण्याचे मान्य केले.परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सापळा रचला. दरम्यान,आरोपी महेंद्र बगडे यास काल रविवारला दीड हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड,श्रीधर भोसले,पोहवा शंकर डांगे,पोना किशोर जौंजारकर,पोलीस शिपाई संदीप घोरमोडे, संदीप उडाण,प्रवीण जुमनाके,चापोना प्रफुल डोर्लीकर यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!