उद्रेक न्युज वृत्त :- ऐन मकर संक्रातीच्या एक दिवसा पूर्वीच पंजाबच्या तरनतारण जिल्ह्यात काल,रविवारी सकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
चब्बल गावचे सरपंच अवन कुमार उर्फ सोनू चीमा हे एका सलूनमध्ये केस कापत असतांना त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.अवनला रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.कोणत्या कारणासाठी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली; याचा तपास सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

