उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील रहिवाशी असलेले व गडचिरोली जिल्हा सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख लिलाधर दादाजी भर्रे यांनी राज्याचे विरोधीपक्षनेता आ.विजय वडेट्टीवार हे देसाईगंज येथे आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य चाहत्यांसह वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
देसाईगंज येथील शासकीय विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रमात पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,डाॅ.नामदेव किरसान,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकु बावणे,मिडीया प्रमुख मोहित अत्रे तसेच भर्रे यांचे असंख्य चाहते कार्यकर्ते उपस्थित होते.भर्रे यांच्या पक्षप्रवेशाने तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

