Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील नवव्या सत्रात संजय बन्सल विजयी….

नाट्यश्री कविता स्पर्धेतील नवव्या सत्रात संजय बन्सल विजयी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे नववे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून उमरेड (जि.नागपूर) येथील प्रसिद्ध कवी,नाट्यलेखक व दिग्दर्शक संजय  बन्सल  यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  “म्हणालो…” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.संजय बन्सल हे विदर्भातील प्रसिद्ध कवी,नाट्यलेखक व दिग्दर्शक असून ते उमरेड (जिल्हा – नागपूर) येथील रहिवासी आहेत.आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध एकांकिका व नाट्यस्पर्धातून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांनी दिग्दर्शित केलेल्या”हा अंधार पेटलेला” या एकांकिकेला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. 

त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 या नवव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  संतोष कपाले, प्रेमिला अलोने, विलास जेंगठे,तुळशीराम उंदीरवाडे, संगीता धोटे,संजय बन्सल,कृष्णा कुंभारे,गणेश रामदास निकम,सुनील मंगर,मनिषा हिडको,माधुरी अमृतकर,अहिंसक दहिवले,प्रतिभा प्रविण सुर्याराव , वंदना मडावी,प्रभाकर दुर्गे,उपेंद्र रोहनकर , प्रशांत गणवीर,गजानन गेडाम, बाबाजी व्ही.हुले, मुर्लीधर खोटेले,पुरुषोत्तम लेनगुरे,स्वप्नील बांबोळे, सुजाता अवचट,ज्योत्स्ना बन्सोड,चरणदास वैरागडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!