Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजविजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत लिलाधर भर्रे यांचा काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश…

विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत लिलाधर भर्रे यांचा काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील रहिवाशी असलेले व गडचिरोली जिल्हा सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख लिलाधर दादाजी भर्रे यांनी राज्याचे विरोधीपक्षनेता आ.विजय वडेट्टीवार हे देसाईगंज येथे आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य चाहत्यांसह वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

देसाईगंज येथील शासकीय विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रमात पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,डाॅ.नामदेव किरसान,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकु बावणे,मिडीया प्रमुख मोहित अत्रे तसेच भर्रे यांचे असंख्य चाहते कार्यकर्ते उपस्थित होते.भर्रे यांच्या पक्षप्रवेशाने तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!