Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरवाघोबाने घेतला शेतकऱ्याचा जीव; गावकरी संतप्त..!

वाघोबाने घेतला शेतकऱ्याचा जीव; गावकरी संतप्त..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील आकापूर गाव परिसरातील शेतशिवारात वाघोबाने एका शेतकऱ्याचा जीव घेतल्याची घटना आज,शनिवार २५ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.वासुदेव
लक्ष्मण वेटे वय ५५ वर्षे,रा.आकापूर,ता.नागभीड, जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते शेतावर गेले असता सदरची घटना घडली.विशेष म्हणजे,आकापूर शेतशिवारातील परिसरात काही दिवसांपूर्वीच नागरिकांना वाघाच्या जोडीचे दर्शन झाले होते.याबाबत वनविभागास माहिती देऊनही कुठल्याही प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्यानेच सदरची घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत जोपर्यंत वाघाला पकडले जात नाही आणि शेतकरी-शेतमजुरांच्या सुरक्षिततेची हमी दिली जात नाही,तोपर्यंत मृतदेह उचलला जाणार नाही,अशी भूमिका घेतल्याने काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.घटने प्रसंगी महिला वनपरिक्षेत्र अधिकारी शहा यांनी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करून विविध मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने मृतदेह उचलण्यात आला.ऐन धान कापणी आणि मळणी हंगामाच्या काळातच सदरची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!